Coronaवरून राजकारण आणि राष्ट्रपती राजवट | Bhagat Singh Koshyarin, Devendra Fadnavis, Sanjay Raut

2021-09-13 621

महाराष्ट्राचा कोरोनासोबतचा लढा सुरु असताना आता एक नवाच मुद्दा समोर येतो आहे. एकीकडे प्रशासन कोरोना विरोधात लढण्यात गर्क असताना पडद्याआडून राजकीय लढाईची तयारी सुरु आहे का असा प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे. पण हे सगळं का वाटतंय त्याची कारणं  आधी समजून घेऊया. ज्या पद्धतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे ते बघता काहीतरी सुरु असल्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या असरकारावर राज्यपाल नाराज असूनते  राष्ट्रपती राजवट लागू करणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि एकच गोंधळ उडाला आहे.मागील काही दिवसांपासून भाजपचे प्रवीण दरेकर, मंगलप्रसाद लोढा आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या कारणांनी राज्यपालांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर त्या मागोमाग खासदार संजय राऊत हेही राज्यपालांना भेटले. राऊत यांची महाविकास आघाडी बनवण्यात असलेली भूमिका लक्षात घेतली तर त्यांच्या भेटीने अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि चर्चांना उधाण आलं. या भेटीत त्यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही नुसते चहापान होते असे सांगितले. मात्र तरीही पवार नुसते चहापान करायला राजभवनावर जातील यावर विश्वास ठेवायला अनेक राजकीय विश्लेषक तयार नाहीत. दुसरीकडे गडबड असल्याचा दुजोरा मिळाला तो पवार हे मातोश्रीवर गेल्यामुळे. एकाच दिवसात राष्ट्रपतींची भेट आणि त्याच रात्री मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा यामुळे महाविकास आघाडी अडचणीत असल्याचा दावा सुरु झाला. दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आणि थेट चर्चेला तोंड फुटले. ,जाणून घ्या डॉ उल्हास बापट, घटनातज्ञ यांच्या कडून

#Sanjayraut #UddhavThackeray #LokmatNews #Rashtraptirajwat #Devendrafadnavis #BhagatSinghKoshyari
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि

Videos similaires